आजही आहे तिकोना किल्लेदार ! ३० वर्ष्याचा मावळा.. मागील १० वर्ष करतोय किल्लेदार म्हणून स्वराज्याची सेवा … नक्की वाचायलाच हवं.. शिव जयंती विशेष

जय भवानी जय शिवराय :

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा आणि मनाचा मुजरा ! आणि सर्व देशवासियांना शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

आता शिवजयंती साजरी न करणारा माणूस महाराष्ट्रातच काय अख्ख्या देशात मिळणे तशे कठीणच …. आपण मावळे स्वतःच्या वाढदिवसाची हि इतक्या आतुरतेने वाट कधी पाहत नाही जेवढी या आपल्या लाडक्या आणि अस्मितेच्या सणाची वाट पाहतो … आणि सणाच्या कित्तेक दिवस आधीपासूनच तयारी सुरु करतो … काय तो अभिमान काय तोच आनंद खरंच शब्दात वर्णन कारण खरंच कंठीण आहे ….

आज शिव जयंती .. तस महाराजांबद्दल लिहिण्याएवढी माझी लायकी मुळीच नाही .. पण कालचे थोडे प्रकार बघून थोडं लिहावं वाटतंय …

जयंती साजरी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते या बद्दल दुमत नाही … हा आणि ती कशी साजरी करावी हा ज्याचा त्याचा वयक्तीक प्रश्न असला तरी तुम्ही कोणाची काय करताय याच भान असायला हवं कि नको …

काळ पाहिलं १०  वि  १२ वि ची  पोर … गाड्यांचे पुंगळे काढून करण कर्कश आवाज काढत पूर्ण शहरभर एका गाडिवर ४ ४ बसून फिरत होते..

dj वर आशिक बनायला आपने गाणं चाललेलं .. काय चालेल मला काहीच कळलं नाही …

पण घरी आल्यावर हि बातमी टीव्ही वर पहिली आणि मन शांत झालं बातमी आहे ती एक सच्च्या मावळ्याची सुजित मोहिते राहणार तुंग आणि काय करतो तर तिकोना किल्ल्याचा किल्लेदार आहे …

हे आहेत तिकोना किल्ल्याचे आताचे किल्लेदार सुजित मोहिते … हे साहेब मागच्या १० वर्ष्यापासून तिकोना किल्ल्यावर किल्लेदार म्हणून काम करताहेत ..
काय पटत नाही ना … पण खर आहे ..

सुजित मोहिते एकदा तिकोना किल्ल्यावर गेले असता तिथली दुरावस्था त्यांना बघवली नाही … आणि त्यांनी हा किल्ल्यांची रक्षण करण्याचा निर्णय घेतला … आणि त्या दिवसापासून सुजित मोहिते तिकोना किल्ल्यावर वर्षाचे ३६५ दिवस किल्लेदार म्हणून काम करतो … ऊन पाऊस वर कश्याची हि तम ना बाळगता ..

हा आता युद्ध वगैरे तर नाही पण येथे येणाऱ्या पर्यटकांना शिव प्रेमींना .. किल्ल्याची माहिती देणे . त्यांना किल्ला स्वच्छ ठेवण्यासाठी जागरूक करणे … आणि एकूणच हा किल्ला जोपासणे हाच एकमेव ध्येय आहे सुजित मोहित यांचा …

आता बघा एकी कडे अशे मावळे आहेत ते खरोखर शिव प्रेमी आहेत … स्वराज्यासाठी इतका मोठा पराक्रम करताहेत आणि आणि एकीकडे … हि गाड्यांची पुंगळी काढून वाजवत फिरून शिवजयंती करणारे लोक …

जास्त काय लिहावं

जय शिवाजी जय भवानी जय शिवराय

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!