आपल्या आजूबाजूला घराचे अंगणात उगवणाऱ्या या वनस्पती चे महत्व माहिती आहे का तुम्हाला

शेतीचा बांधावर, घरातील परसबाग आणि कचऱ्याच्या ठिकाणी घोळ भाजी वाढत असते. त्यासाठी कुठलेही प्रयत्न करावे लागत नाहीत. घरात घोळ भाजीचा झुणका, दाळभाजी आणि मोकळी भाजी अतिशय चवीने खाल्ली जाते. घोळ भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि लोहतत्त्व असते. शरीरात लोहतत्त्व कमी झाल्याने साखरेचे प्रमाण वाढत गेल्यास मधुमेह होतो. भारतात दर दहावा व्यक्ती मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे त्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी घोळ भाजीतील जीवनसत्त्वे, प्रथिने आणि लोहतत्त्वाचा आधार घेत, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या फूड टेक्‍नॉलॉजी विभागातील एमटेक शाखेच्या प्रशांत लुंगाडे या विद्यार्थ्याने हे संशोधन यशस्वी केले आहे.

 

या वनस्पती चे महत्व माहिती आहे का तुम्हाला

आपण या रोपट्याला आपल्या घराजवळ नक्कीच पाहिले असेल. याला पर्स्लेन आणि कुलफा या नावानेही ओळखले जाते. अनेक लोक या रोपट्याला जंगली रोपटे म्हणूनही तोडून फेकतात. हे रोपटे अनेक न्यूट्रिएंट्सचे भंडार आहे. अनेक लोकांना याची विशेषतेबाद्दल माहिती नाही, जेवणामध्ये याचे टेस्ट जेवढे चांगले आहे. त्याहून अधीक न्यूट्रीशन याला उपयोगी बनवतात. भारतात सर्वत्र (शेतात, बागेत व इतरत्र) तणाप्रमाणे वाढणारी असून हिमालयात १,५५० मी. उंचीपर्यंत आढळते. खोड व फांद्या लालसर असून पेरी फुगीर असतात. पाने लहान, मांसल, साधी, बिनदेठाची, एकाआड एक, काहीशी समोरासमोर, तळाशी निमुळती व टोकाकडे गोलसर असून त्यांच्या कडा लाल असतात. फुले बिनदेठाची, पिवळी, लहान व फाद्यांच्या टोकास झुबक्याने येतात.

रोपट्यामध्ये ओमेगा 3s मुबलक प्रमाणामध्ये असते. आतापर्यंत आपल्याला ही माहिती असेल की, ओमेगा 3 फॅटी अॅसीड माशा, अंडी आणि फिश ऑईल सप्लीमेंटने मिळते. या अॅसिडमुळे बुद्धि तल्लक होते, आणि हार्ट अटॅकची संभावनाही कमी होते. अशामध्ये जर आपण शाकाहरी असाल तर, ओमेगा 3 मिळवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

घोळाची भाजी बुळबुळीत असली तरी औषधी गुणाची आहे. त्यात एक क्षार आहे. चवीने ओशट असलेली घोळाची भाजी थंड गुणाची असून अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते. रक्ती, मूळव्याध, दातातून रक्त येणे, सूज, अंगाचा दाह, मूत्रपिंड व बस्तीच्या विकारात उपयुक्त आहे. विसर्प किंवा धावरे, नागीण विकारात पाने वाटून त्यांचा लेप लावावा.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!
%d bloggers like this: