केसगळती थांबवायचे असतील तर करा हे ५ घरगुती उपाय

आपल्या डोक्यावर जवळजवळ लाखोंच्या संख्येने केसं आहेत. जर प्रत्येक दिवसाला ५० ते १०० केसं रोज गळत असतील तर हि एक सामान्य गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा जास्त केसं गळत असतील तर मात्र तुम्हांला तुमच्या केसांवर लक्ष द्यायची गरज आहे. आणि केस गळती थांबण्यासाठी तुम्ही बाजारात महागातले महाग शॅम्पू आणि कॉस्मेटिक्स वापरून सुद्धा त्रस्त असतील तर आम्ही तुम्हाला सर्वात फायदेशीर घरगुती उपाय सांगत आहोत. ज्याने केसगळती तर थांबेलच शिवाय केसं सुद्धा मजबूत होतील.

१. केसांची मसाज :

सर्वात पहिला जर तुम्हाला केसगळती थांबवायची असेल तर अगोदर तुमच्या टाळूवर चांगली मालिश करा. योग्य रीतीने टाळूवर मालिश केल्याने डोक्यात रक्तप्रवाह चांगला होतो त्यामुळे केसं मजबूत होतात आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते. तुम्ही मसाजसाठी टाळूवर खोबरेल तेल, एरंडीचे तेल, आवळ्याचे तेल वापरू शकतात.
वर सांगितल्या प्रमाणे कोणत्याही एका तेलाचा उपयोग तुमच्या टाळूवर आणि केसांवर दिवसातून कमीत कमी एकदा असे आठवडा भर जरूर करा. केसगळती थांबण्यास मदत होईल.

२. आवळा :

नैसर्गिक आणि जलद केसांच्या वाढीसाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकतात. आपल्यामध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात असते. केसगळतीचे कारण व्हिटॅमिन C ची कमतरता सुद्धा असू शकते. आणि आवळ्याचा उपयोग करून तुम्ही व्हिटॅमिन C ची कमतरता दूर करू शकता. आवळ्यात असलेले antioxidant, antibacterial हे गुण टाळू स्वस्थ आणि केसांची वाढ जलदगतीने होण्यास मदत करतात. आवळा आणि लिंबाचा रस एक-एक चमचा घेऊन ह्याचे मिश्रण करा, रात्री झोपताना टाळूवर वर मसाज करा आणि पूर्ण रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी शॅम्पूने केसं नीट धुवा. तुमच्या केसांवर एक वेगळीच चमक येईल.

३. मेथीच्या बिया :

मेथी केसगळती थांबण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते. मेथीच्या बियांमध्ये हॉर्मोन अगोदर पासून असतात ज्यामुळे केसांची वाढ जलद होण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांमध्ये पूर्ण निर्मिती साठी मदत होते. मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ऍसिड असते जे केसांच्या वाढीस मदत करते.
एक कप पाण्यात मेथीच्या बिया रात्रभर भिजून ठेवा सकाळी उठल्यावर त्याचा पेस्ट बनवण्यासाठी ते वाटून घ्या आणि आपल्या केसांवर हा पेस्ट लावा. ४० मिनिटं हा पेस्ट केसांवर राहू द्या आणि नंतर पाण्याने केसं धुवून घ्या. असे प्रत्येक दिवस महिनाभर करा.

४. कोरफड :

कोरफड मध्ये Enzymesअसतात जे आपल्या केसांची वाढ आणि त्यांना मजबूत करतात. कोरफड आपल्या टाळू आणि केसांतील ph योग्य प्रमाणात ठेवते ज्यामुळे केसं वाढण्यास मदत होते.
ह्याच्या नियमित वापराने डोक्यावर येणारी खाज कमी होते आणि डोक्यातील सूज कमी करून केसांना मजबुती देऊन केस चमकदार करते. कोरफड चा रस टाळूवर लावा आणि काही तास तसाच राहू द्या आणि डोकं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा कोरफडचा रस वापर. ह्यामुळे तुमची केसगळतीची समस्या लवकर दूर होईल.

५. ज्येष्ठमध (Licorice Root) :

ज्येष्ठमध एक अशी वनस्पती आहे जी केसगळती आणि केसांना होणाऱ्या समस्यांपासून थांबवते. ज्येष्ठमध केसांच्या छिद्रांना खोलणे आणि टाळूला थंडावा देण्याचे काम करते. त्यामुळे डोकं शांत राहते. केसगळती आणि टक्कल पडण्यापासून रोखण्यासाठी ज्येष्ठमध चांगले काम करते.
ज्येष्ठमध ला एक कप पाणी आणि एक कप दुधासोबत चांगलं मिश्रण करा आणि त्याचे पेस्ट बनवून टाळूवर लावा. रात्रभर हे मिश्रण तसेच ठेवा आणि सकाळी केसांना स्वच्छ धुवा. हा प्रयोग आठवड्यातून एक किंवा दोन वेळा नक्की करा.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!