गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्ष्यांचे धडे देणारा हा अवलिया १६ व्या वर्षी डॉक्टर झाला आणि २१ व्या वर्षी आय ए एस

गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्ष्यांचे धडे देणारा हा अवलिया १६ व्या वर्षी डॉक्टर झाला आणि २१ व्या वर्षी आय ए एस त्यांनतर २ वर्षातच नोकरी सोडून आता समाजातल्या गरीब होतकरू मुलांना सिविल सर्विसेस च्या परीक्षेचे धडे देतात .

हि गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे . आपल्यातल्या प्रत्येकाने आपल्या आवडत्या विषयात यश संपादन करण्यासाठीची जिद्द आणि चिकाटी कशी मिळवावी हे सांगणारी हि गोष्ट आहे राजस्थान जयपूर च्या रोमन सैनी यांची नक्की वाचा आणि शेर करा..

 

रोमन यांची आई एक गृहिणी तर वडील हे इंजिनीअर आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे दिसतं तेवढे सोपं नव्हतं. रोमन आधुनिक भारतातील त्या तरुणांचे नेतृत्व करतात ज्या तरुणांचा खडतर प्रवासातून यश संपादित करणे हा छंद असतो. रोमन हे डॉक्टरी पेशात असोत की आयएएस अधिकारी, ते समाजातील प्रत्येक घटकाला मदत देण्याचा प्रयत्न करत असतात. ते तरुणांना सांगतात की त्यांना परीक्षा संबंधित काही अडचणी असो की अन्य कुठल्याही समस्या असो तर रोमन यांच्याशी त्यांच्या फेसबुक च्या माध्यमातून संपर्क साधू शकता.

रोमन ना शाळा आणि शिक्षण मुळीच आवडायचं नाही . शाळेतून बऱ्याचदा पळून जायचे

रोमन यांचे हे यश पाहून आपल्याला नक्कीच वाटेल ते एक हुशार , आदर्श विद्यार्थी असतील , पण असा मुळीच नाहीये त्यांना शाळा आणि अभ्यास या गोष्टींचा नेहमीच तिटकारा येत असे . अभ्यासात ते अतिसामान्य होते . घरातली परिस्थिती हि अगदी नाजूकच होती . पण मूळच्या जयपूर च्या या युवकाने परिस्थिती वर मात करत यश संपादित केले .

रोमन सांगतात कि त्यांना मार्क्स मिळवण्यात कसलाही इंटरेस्ट नसे . तते बऱ्याचदा परीक्षा नको म्हणून शाळेतून पळून हि जायचे . ज्या विषयाची आपल्याला आवड आहे त्याच विषयात आपण काम करावं असा त्यांचं प्रामाणिक मत आहे . आणि याच कारणासाठी त्यांनी सिविल सर्विसेस ची परीक्षा दिली .

 

१६ व्या वर्षी डॉक्टर झाले आणि २१ व्या वर्षी आय ए एस आणि आता एक यशस्वी उद्योजक आहेत .

रोमन हे त्यांच्याच एका दुनियेत रमलेले असायचे, व त्यातच त्यांना आनंद मिळत असे. त्यांनी आपल्या आयुष्यात त्यांना आवश्यक वाटणाऱ्या गोष्टीनाच स्थान दिले. आवश्यक न वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रोमन यांनी कधीही आपला वेळ वाया घातला नाही. याच कारणामुळे त्यांनी निर्भेळ यश संपादित केले व ते आता लोकांच्या कामास येण्यासाठी पात्र ठरत आहेत.

 

२ वर्षातच नोकरी सोडून दिली

याच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 2१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. पण तिथं त्यांचं मन रामाला नाही आणि त्यांनी २ वर्षातच नोकरी सोडून दिली.

ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतात. ही एका आपल्या सारख्याच सामान्य व्यक्तीची कथा आहे. ही प्रेरणादायी कथा आहे राजस्थान च्या रोमन सैनी यांची. रोमन यांनी त्यांच्या आयुष्यात ते करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कामात यश संपादित केले आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना जे मनापासून आवडायचं तेच ते करायचे, हेच त्यांच्या यशाचे कारण होते. त्यांचं देशातील प्रत्येक तरुणांचं भविष्य उज्वल करण्याचं स्वप्न आहे.

सोपा होता का हा प्रवास ? नाही मुळीच नाही

एक सामान्य गरीब घरातला अभ्यासात अगदीच सामान्य असणारा हा मुलगा फक्त आणि फक्त आपल्या जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर , देशातील सगळ्यात अवघड मनाली जाणारी स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली .

 

सध्या काय करतात रोमन ??

रोमन यांनी गरीब आणि जिद्दी मुलांना सहज शिकता यावं यासाठी एक ट्रैनिंग अकॅडेमी सुरु केली . आता ता तिच्या माध्यमातून सर्व थरातील मुलांना शिकवताहेत आणि स्पर्धा परीक्ष्यांसाठी तयार करत आहेत . एकूणच भारताचे भविष्य घडवत आहेत .

त्यांनी एक अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनअकॅडमी ची सुरुवात युट्युब पासून केली. जे की रोमन यांचे मित्र गौरव यांनी बनवले होते. त्यांनी आता पर्यंत 10 लाखांहून अधिक व्हिडीओ प्रसारित केले आहेत. ज्यातून 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. आता पर्यंत 25 शिक्षक त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत.

रोमन यांचा सोशिअल मीडिया वर बोलबाला आहे …

त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून रोमन देशभरातील यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मार्गदर्शनाचे अनेक व्हिडीओ रोमन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये रोमन विद्यार्थ्यांना अनेक विषयांचे मार्गदर्शन करतात व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही देत असतात. रोमन याना कधी वेळ मिळाला तर ते या परीक्षार्थींना भेटत ही असतात.

सगळ्यांना प्रेरणा देणारा हा प्रवास आपल्या प्रत्येकांच्या आप्तेष्टपर्यंत पोहोचवण्यासाठी नाकी शेर करा ..

 

स्रोत खासरे.कॉम

 

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!