गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर

दे धक्का मधला मकरंद अनासपुरे आठवतो का ? गाडीचे एव्हरेज वाढवण्यासाठी बापाची ६ एकर शेती विकून एका पार्ट च्या मागे वेड्यासारखे काम करणारा !

हा त्याला यश मिळालं असाल त्यावेळी ते फक्त रुपेरी पडद्यावर त्याचा सर्वसामान्यांना काही फायदा नाही .
पण उत्तर प्रदेश मधील या तरुणाने हि कमल करून दाखवलिये या छोट्याश्या प्रयोगाने गाडीचे इव्हरेज ३ पत म्हणजे १५० किमी एवढे मिळेल.

नक्की वाचा तुमच्या आमच्या फायद्याची गोष्ट आहे ..

या युवकाने असे काही जुगाड केले आहे की, यामुळे त्याची मोटरसायकल1 लिटर पेट्रोल मध्ये 153 किमी चं एव्हरेज देत आहे. तुमची गाडी किती एव्हरेज देते? फक्त 70 चे ना. यानुसार तर हे एव्हरेज दुप्पटच झाले आहे.

आता तुम्हाला विश्वास ही बसत नसेल की एखाद्या गाडीच एव्हरेज एव्हडं होऊ शकतं. पण हे खरं आहे. अशाच एका जुगाडाला एक टेक्निक मध्ये बदलण्यात आले आहे. आणि आणखी विशेष बाब म्हणजे याला उत्तर प्रदेश कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबतच एका राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ने प्रमाणित केले आहे.

हे जुगाड एवढे स्वस्त आहे की फक्त काही रुपयांमध्ये एक छोटासा बदल करून 153 किमीचं एव्हरेज मिळू शकते. पण तुम्हाला कसे हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर ही माहीती शेवटपर्यंत वाचल्यावर कळेल. उत्तर प्रदेशचे कोशांबी जिल्ह्यातील गुदडी गावचे रहिवासी विवेक कुमार पटेल. ते अनेक वर्षापासून बाईक इंजिनवर काम करत होते. आता कुठे त्यांना यामध्ये यश मिळाले आहे. गाडीच्या इंजिनमध्ये विवेक कुमार यांनी थोडासा बदल केला. त्यानंतर गाडीचे एव्हरेज जवळपास 153 किमी प्रति लिटर देण्यास सुरुवात केली. विवेक कुठल्याही मोटरसायकलच्या इंजिनमध्ये आपल्या पद्धतीने हलकासा बदल करून त्या गाडीचे एव्हरेज 30-35 किमी. वाढते.

नवभारत टाइम्सनुसार विवेकचा हा जुगाड फक्त एक जुगाडच नाहीये तर ती एक टेक्निक म्हणून पुढे येत आहे. कारण की याला उत्तर प्रदेश कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबतच एका राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ने प्रमाणित केले आहे. या तंत्रामध्ये फक्त कार्बोरेटर ला बदलावं लागतं. विवेक गाडीमध्ये बसवलेले कार्बोरेटर काढून आपले कार्बोरेटर लावतात. यांनातर गाडीचे एव्हरेज चांगलेच वाढते. बोलले जात आहे की यामध्ये फक्त पाच रुपये खर्च येत आहे. मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार या तंत्रामध्ये कार्बोरेटर ला सेट केले जाते.
या तंत्रज्ञानाचे पेटंट झाल्यानंतर मोटरसायकल बनवणाऱ्या कंपन्याही ते खरेदी करू शकतात. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जास्त मायलेजच्या गाड्या विकून कंपन्या आपला नफा चांगलाच वाढवू शकतात. दुसरीकडे या गाड्या बाजारात आल्या तर पेट्रोलची विक्री कमी होण्यास मदत होईल. 2015 च्या एका माहितीनुसार देशभरात एकूण 15 कोटी मोटरसायकल आहेत. आता दोन गाड्यांच्या बरोबर एव्हरेज एक गाडी देत असेल तर पेट्रोल कंपन्याचे हाल तुम्ही समजू शकता.

कटरामधील श्री माता वैष्णवी देवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिझनेस एक्युबेशन सेंटर विवेक च्या या तंत्रज्ञानाला एक स्टार्टअप म्हणून रजिस्टर केले आहे. यासाठी सेंटरकडून स्टार्टअप प्रोजेक्टसाठी 75 लाख रुपयांची मदत ही मिळाली आहे.

One thought on “गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर

  • November 7, 2017 at 3:50 pm
    Permalink

    Karborator milega kya

    Reply

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!