चित्रपट ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार , रितेश देशमुख आणि सलमान खान साकारतील भूमिका

रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आजवर बऱ्याच माध्यमांतून आपल्या भेटीला आल्या. इतिहासाच्या पानांवर स्वर्णाक्षरांमध्ये नमूद करण्यात आलेल्या मराठ्यांच्या पराक्रमी पर्वात महाराजांचं मोलाचं योगदान. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती नेहमीच कथा-कादंबऱ्या, नाटकं, धारावाहिक यांच्या माध्यमातून पुढे आली.

बाहुबली चित्रपटाचे निर्देशक आणि पटकथा लेखक एस॰एस॰ राजामौली यांच्या नेतृत्वाखाली आणि मराठी रसिकांचा आवडता डायरेक्टर रवी जाधव हयांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट साकार होतोय तर रितेश आणि जेनेलिया देशमुख प्रोडूकशन खाली हा चित्रपट साकार होतोय. चित्रपटासाही तब्बल २२५ कोटी हुन अधिक भांडवल खर्च होणार आहे. भव्यदिव्य देखावे आणि पोशाख, घोडे, हत्यार यामुळे हा खर्च आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

त्यातही छत्रपतींची भूमिका साकारण्याची संधी मिळालेल्या चेहऱ्यांना प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळालं. रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

तकेच नव्हे तर बॉलीवूड मधील बरेच कलाकार या चित्रपट दिसणार आहेत. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान ही ह्या चित्रपटासाठी काम करणार असल्याची वार्ता आहे. खुद्द राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर चित्रपटाबद्दल लिहल्यामुळे चित्रपटाची जोरदार चर्चाही झाली.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!