The Blog Time Marathi,News डॉन मन्या सुर्वे : ज्याला घाबरून दाऊद भारतातून पळाला

डॉन मन्या सुर्वे : ज्याला घाबरून दाऊद भारतातून पळालात्याच्या आयुष्यावर शूट आउट एट वडाला हा चित्रपट आला या मध्ये जॉन अब्राहमनि मण्याची भूमिका उत्तमरित्या पार पडलेली आहे. या चित्रपटातून मन्या बऱ्याच प्रमाणात समजून घेतला जाऊ शकतो.

मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे (मराठा) हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.

मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता.


तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल पण तसे न्हवते तो एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. शाळा व महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर तत्कालीन एसपी इसाक बागबान यांनी केला होता. इसाक बागबान हे मुळचे बारामतीचे आहे.

 

 

मन्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस सर्वाकरिता तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा गेम करण्यामागे लागले होते परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण चालले होते. माणूस प्रेमात हरतो व मन्यासोबत हि तशेच झाले मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसविले आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एनकाऊन्टर केला.

IPS bagwan

मन्या सुर्वेचे पुणे शहराशी जबरदस्त नाते राहिले. मन्याचा जन्म 1944 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रनपूर येथे झाला होता. तो आपल्या आई व सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप स्मार्ट होता. त्याला इंजिनियर बनायचे होते. मात्र, कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गॅंग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला. मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या १९६९ घडविली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. त्याला शेवट पर्यंत मण्याचा बदला घ्याचा होता पण तो त्याला शक्य झाला नाही. दाउद मन्याच्या नावाने घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्याने दाउदला अनेक वेळेस मारून टाकायची धमकी दिली होती.

या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली. त्याला पुण्याच्या येर्वादा कारागृहात ठेवण्यात आले. जेलमध्येही त्याचा दबदबा होता. तो जेलमध्ये दादा झाला. तेथे त्याने अनेक कैदी त्याच्या गैंगमध्ये सामील केले. जेल प्रशासन मन्यापुढे थकले. येथेच त्याची दुष्मनी सुहास भटकळ नावाच्या कैद्यासोब्त झाली. मन्या व सुहास यांचे जेल मध्ये वेगवेगळे गट होते. त्यानंतर मन्या जेलमधील सुहासच्या गैंग मधील साथीदाराना मारू लागला. प्रशासनाला हि बाब ध्यानात आली परंतु पुरावे सापडत नव्हते म्हणून मन्याला रत्नागिरी जेल मध्ये पाठविण्यात आले.

त्याला बेकायदा रत्नागिरी जेल मध्ये पाठविले म्हणून मन्याने जेलमध्येच उपोषण सुरु केले. तो जेवण घेत नसे त्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरीयेथील दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र मन्याच्या डोक्यात वेगळाच प्लान होता तो १४ नोव्हेंबर १९७९ रोजी रत्नागिरी येथील दवाखान्यातून पळून जाण्यास यशस्वी झाला. त्यानंतर तो ११ जानेवरी १९८२ मध्ये एनकाउंटर मध्ये मारल्या गेल्या तो पर्यंत तो फरारच होता.

दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर मन्याने आपली गॅंग पुन्हा वाढवली. पुण्यातील जेलमध्ये 9 वर्षे राहून आल्याने मन्या आता तरबेज गुन्हेगार बनला होता. पुण्यातील येरवड्यातील वास्तव्यानेच मन्या अंडरवल्डचा बादशाह बनण्यास मदत झाली. मन्याची गुन्हेगारीही त्यामुळे वाढली. मन्याचा विश्वास हजारपटीने वाढला होता. तो आता कोणलाही दिवसाढवळ्या ‘खल्लास’ करु लागला होता. तत्कालीन अंडरवर्ल्डमधील हाजी मस्तान, बाटलीवाला यांच्यासारख्या टोळ्यांना व नव्याने उदयास येत असलेल्या दाऊद गॅंगला तो उघड आव्हान देत होता. भ्रष्ट पोलिसांना तो उघडे-नागडे करुन मारहाण करुन बदला घ्यायचा. त्यामुळे पोलिस त्याला कमालीचे घाबरुन होते. त्याच्याविरोधात सर्वच चिडीचाप असत. आणि तो लोकामध्ये हिरो बनू लागला. पोलिसांनी त्याचा बदला घेण्यासाठी बनाव रचत त्याला एनकाऊंटरमध्ये मारले. या एनकाऊंटरचे नेतृत्त्व पुणे जिल्ह्यातील बारामतीचे रहिवाशी असलेले तत्कालीन एसीपी इसाक बागवान यांनी केले होते. बागवान यांनीच मन्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

याबाबत सांगितले जात आहे की, मुंबईत मन्याची एवढी दहशत वाढली होती की त्याकाळच्या डॉन यांना मन्या सहज पाणी पाजत होता. त्यामुळेच त्याकाळच्या मुस्लिम डॉननी मिळून राजकीय वरदहस्ताने मन्याची हत्या घडवून आणली. मन्यासाठी पुणे येरवडा जेल सर्वात सुरक्षित जागा होती. कारण त्याचे राज्य होते. सर्व कैद्यांचा तो दादा होता. मात्र जेलमधून पळाला व मुंबईत गॅंग बनविली व त्यानंतर तो दोन-तीन वर्षातच तो मारला गेला.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!