दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांचा साखुरपुडा – बघा खास फोटो

दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची कन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसची अध्यक्ष स्मिता पाटील यांचा साखुरपुडा आज त्यांच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी संपन्न झाला. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातली अनेक जण उपस्थित होते. 1 मे 2018  या तारखेला स्मिता पाटील विविहबंधनात अडकणार आहे.

दौंडचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचं लग्न जमलं आहे. आनंद थोरात हे बांधकाव व्यावसायिक असून ते पुण्यात व्यवसाय करतात.

त्यामुळे स्मिता पाटील ही दौंडची सून होणार आहे. या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं कळतंय. लग्नानंतर स्मिता पाटील या पुणे जिल्ह्यातून आपली राजकीय कारकिर्द सुरू करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!