युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हत्ती आणि तोफा का वापरल्या नाहीत?

राजा म्हटलं कि हत्ती, घोडे, तोफा तलवारी आल्याच. पण तुम्ही कधी असं ऐकलंय कि शिवाजी महाराजांनी दुश्मनांवर आक्रमण करण्यासाठी कधी हत्ती आणि तोफा वापरल्यात? नाहीना … इतिहासात अशी कोठे नोंदही नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना बऱ्याचश्या लढाया लढल्या बरेचसे किल्ले हि हस्तगत केले पण कधीही हत्ती आणि तोफांचा वापर केला नाही असं का? ते आपण पाहुयात..

युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हत्ती आणि तोफा का नाही वापरल्यात तुम्हाला माहिती आहेत का? युद्धाच्या वेळी घोड्यावर तोफा नेता येत नाहीत त्याला ओढण्यासाठी हत्तीच लागतो आणि हत्तीवर नेण्यासाठी त्याचा बराचसा खुराक हि सोबत न्यावा लागतो. त्यासाठी मनुष्यबळ हि अडकून राहते. अश्या तोफा दूरवर नेण्यासाठी फार काळहि लागतो तोवर दुष्मनाला आपण आक्रमण करणार याची चाहूलही लागते. शिवाय जर अश्या तोफा वापरल्या तर दुष्मनाच्या किल्ल्याचे खूप नुकसान होते आणि किल्ला जिंकला तरी त्याची मरम्मद करण्यात खूप पैसे आणि काळ वाया जायचा.

शिवाजी महाराजांना तसं नको होत त्यांना पूर्ण किल्ला शाबूद घ्यायचा होता त्यामुळे महाराजांनी मावळ्यांना असं प्रशिक्षण दिल होत ज्यात मावळे दिवसभर किल्याखाली दबा धरून बसतील आणि रातोरात किल्ल्याच्या कडा वर चढतील आणि खालील मावळ्यांना दोरीच्या साहाय्याने वर खेचून घेतील. रात्री दुश्मन निद्रेत असतानांच त्याच्यावर हल्ला करायचा आणि किल्ला काबीज करायचा.

अश्या प्रकारच्या रननीतीने स्वराज्य स्थापन करताना महाराजांना कमी कालावधीत मोठे यश लाभले आणि ह्याच कारणामुळे शिवाजी महाराजांना लवकरात लवकर थेट दिल्ली पर्यंत मजल मारता आली. ह्या विरुद्ध महाराजांनी अश्या बसक्या तोफा किल्ल्यावर लावल्या जेणेकरून दुश्मन किल्याच्या बाजूने आक्रमण करायला चालून आला तरी ह्या तोफांच्या माऱ्यापुढे टिकू शकणार नाही आणि किल्ला अभेद्य राहील.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!