पेपर मध्ये बांधलेले पदार्थ खाल्याने होतो हा आजार .. FSSI चा रिपोर्ट ! नक्की वाचा

वडापाव आणि समोसा हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा खाद्य पदार्थ म्हटलं तरी चालेल. छोटी भूक भागवण्यासाठी आणि थोडा हि वेळ ना लावता अगदी कधीही खाण्यासाठी तयार असणारा हा पदार्थ सगळ्यांचा च प्रिय आहे .

हा आता हॉटेल मध्ये बाकीचे पदार्थ आपण प्लेट मध्ये खातो . पण या वडापाव किंवा सामोस्याची खासियत अशी कि हा हातात घेऊन हि खाता येतो आणि पेपर मध्ये हि ..पण थांबा जरी वृत्तपत्रामध्ये समोसा किंवा वडापाव खान जरी वेळ आणि मेहनत वाचवणार असल तरी तुमच्या तब्बेतीसाठी किती वाईट आणि आणि भयंकर रित्या हानिकारक आहे हे तुम्हाला माहित नसेल ..

हा.. हे आम्ही म्हणत नाहीये हे खुदा भारतातील खाद्य पदार्थांसाठी मानकपत्र देणाऱ्या भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSI) म्हटले आहे

जाणून घ्या का आणि कस ते

स्त्यावरील विक्रेत्यांकडून सर्रासपणे वृत्तपत्राचा वापर होत असतो. त्याशिवाय घरात तेलात केलेले फराळ, खाद्यपदार्थ केल्यानंतर पदार्थातील तेल शोषण्यासाठी वृत्तपत्रात काढले जातात. पदार्थ बनवताना आरोग्याच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली तरी हे वृत्तपत्रामुळे हे पदार्थ आरोग्यास हानीकारक ठरू शकतात. असे ‘FSSI’ ने म्हटले आहे.

वृत्तपत्रांतील शाईमध्ये वापरण्यात येत असलेल्या केमिकलमुळे अन्नपदार्थ दूषित होतात. वृत्तपत्राच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईमध्ये हानीकारक रंगांचाही वापर केला जातो. त्याशिवाय वृत्तपत्राच्या कागदातही घातक घटक असतात. कागदाचा पुर्नवापर करुन तयार करण्यात आलेले कागद, कागदी बॉक्समध्येही विषारी रसायने आढळतात. यामुळे पचन संस्थेच्या आजार होण्याची शक्यता असल्याचे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना अधिक होणार असल्याचेही ‘एफएसएसएआय’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

ग्राहकांनी विक्रेत्यांना वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ देणे बंद करण्यास सांगण्याबाबत आग्रह धरायला हवा असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

सर्व राज्यांमधील अन्नसुरक्षा आयुक्तांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश ‘एफएसएसएआय’ने दिले आहेत.

 

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!