फक्त एका विद्यार्थीनी साठी भरते शाळा !! वाचून अभिमान वाटेल

 केवळ एका वि‌द्यार्थिनीसाठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च करुन शाळा सुरू ठेवण्याचा स्वागतार्ह खटाटोप जिल्हा परिषद करत असेल तर त्याची दखल घेणे गरजेचे ठरते.

आज काळ जिल्हा पारिषदेच्या शाळांचा काय दर्जा राहिलाय या बद्दल चर्चा करायला देखील नको वाटत .
बऱ्याच शाळेतले विद्यार्थी इंग्रजी शाळेत ऍडमिशन घेताहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडताहेत.
पण हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावाने नवीन इतिहास घडविलाय फक्त एका विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी इथे भरते शाळा .
नक्की वाचा.

एक विद्यार्थिनी आणि एक शिक्षक असलेली ही जगावेगळी शाळा भरते हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात. कागदोपत्री इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे आणि अरुण सातपुते हे तिचे शिक्षक आहेत. शाळेत किती विद्यार्थी आहेत याचा विचार न करता, अरुण सातपुते हे गेल्या सहा वर्षांपासून कोपरा येथे विद्यादानाचे कार्य करीत आहेत. पावसाळ्याचे चार महिने तर ते पायीच शाळा गाठतात. गेल्यावर्षी तनूसोबत आणखी एक विद्या‌र्थी होता. परंतु, पाचवा वर्ग उत्तीर्ण झाल्यामुळे तो दुसऱ्या शाळेत गेला. परिणामी यावर्षी तनू एकटीच या शाळेत येते.

एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद करयाचा‌विचार अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु, शाळा बंद पडली तर तनुचे शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावे लागेल, अशी शक्यता असल्यामुळे ही शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने तनूचा वर्ग शेजारील किचनशेडमध्ये होतात. ‘एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना जिल्हा परिषदेच्या अन्य शाळांमध्ये वर्ग करतो. मात्र कोपरा गावापासून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसेच गावात जाण्या-येण्याचा रस्ताही चांगला नाही. शाळा बंद झाली तर तनू अन्य शाळेत जाणार नाही, हे लक्षात आल्यामुळे आम्ही ही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला,’ हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांन सांगितले.

कोपरा गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे अनेक नागरिक अन्यत्र गेले आहेत. आता गावातील घरांची संख्या १४ तर लोकसंख्या केवळ ६४ आहे. त्यामुळे शाळेतील विद्या‌र्थीसंख्या फारशी वाढण्याची शक्यता नाही. कदाचित पाचवीपर्यंत तनू एकटीच या शाळेत राहील. तनुला मात्र शाळेत कोणी सोबत नाही, याची चिंता वाटत नाही. तिला खूप शिकून डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या पालकांचीही तिने शिक्षण सुरू ठेवावे अशी इच्छा आहे. ‘ती शिकते याचे आम्हाला समाधान वाटते. शाळेत ती एकटीच असली तरी अभ्यासाचा कंटाळा करत नाही. शासनाने तिच्यावर दाखवलेला विश्वास ती सार्थ ठरवेल,’ असे तनुचे वडील राजू मडावी म्हणाले.
जपानमधील रेल्वे आणि कोपऱ्याची शाळा!

जपानमधील एका छोट्याशा गावातील केवळ एका विद्यार्थिनीला शाळेत जाता यावे यासाठी एक रेल्वेगाडी त्या गावाला दररोज सेवा देते, अशा आशयाची एक व्हॉट्स अॅप पोस्ट फिरत असते. मुलींच्या शिक्षणाबाबत जपानमधील जागरुकता आणि भारतातील अनास्था य तुलना या पोस्टमध्ये केली आहे. मात्र, या पोस्टमधील दावा खोटा असल्याचे वर्धा जिल्हा परिषदेने सोदाहरण स्पष्ट केले आहे.

Source : https://maharashtratimes.indiatimes.com

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!