बॉलिवूडचे लोकप्रिय व्हिलन्स आणि त्यांच्या सुंदर पत्नी

बॉलिवूडने चित्रपटांना फक्त चांगली गाणी, चांगले अभिनेते किंवा डायलॉग्ज च नाही दिलेत तर असे कलाकार सुद्धा दिलेत जे हिरो नसून सुद्धा लोप्रिय ठरले. हो आम्ही बॉलिवूडच्या व्हिलन्स बद्दल बोलत आहोत. तुम्ही ह्या व्हिलन्सचे भरपूर चित्रपट पहिले असतील आणि त्यांचा अभिनय सुद्धा तुम्हांला खूप आवडला असेल. आज आपण त्यांच्या खऱ्या जीवनातल्या सुंदर पत्नींची ओळख करून घेऊ.

१. अमजद खान आणि शैला खान :

 

 

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्हिलन म्हटलं कि आठवतो गब्बर. शोले चित्रपटातली जेवढे हिरोंचे रोल लोकप्रिय नाही झाले त्याहून जास्त लोकप्रिय चित्रपटाचा व्हिलन झाला. अर्थात गब्बर.
“अर्रे ओ सांबा.. कितने आदमी थे..?”, “तेरा क्या होगा कालिया”, “ये हाथ हमको दे दे ठाकूर”, “होली कब है, कब है होली” सारखे डायलॉग ज्याच्या तोंडून लोकप्रिय झाले असा बॉलिवूडचा गब्बर.
बॉलिवूडच्या ह्या गब्बर ने आपल्या २० वर्षाच्या करिअर मध्ये खूप व्हिलन्स चे रोल्स केलते. त्यांचे लग्न शैला खान सोबत झाले.त्यांना ३ मुलं (शादाब, सीमाब, आलम) आहेत.
जन्म : १२ नोव्हेंबर १९४०, पेशावर
मृत्यू : २७ जुलै १९९२, मुंबई

२. अमरीश पुरी आणि उर्मिला दिवेकर : 

“मोगॅम्बो खुश हुआ” मिस्टर इंडिया मधला डायलॉग तर सर्वांनाच लक्षात असेल. ज्या व्हिलनने हा आवाज दिला ते अर्थात बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय व्हील अमरीश पुरी. आपल्या भारदस्त आणि पहाडी आवाजामुळे त्यांचे डायलॉग्ज लवकर लोकप्रिय व्हायचे.
अमरीश पुरी ह्यांचे लग्न उर्मिला दिवेकर ह्यांच्या सोबत झाले होते. त्यांना २ मुलं आहेत.
जन्म : २२ जून १९३२, लाहोर
मृत्यू : १२ जानेवारी २००५, मुंबई

३ रणजित आणि आलोक बेदी : 

बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त बलात्कारी सिन करणारे आणि पडद्यावर दिसला कि प्रत्येकाच्या मनात खुन्नस निर्माण करणारे व्हिलन म्हणजे रणजित.
रणजित पत्नी आलोक बेदी सोबत आनंदी व्यावहारिक जीवन जगत आहेत. त्यांना २ मुलं आणि एक मुलगी आहे.
जन्म : १२ नोव्हेंबर १९४६

४. शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे :

बॉलिवूडच्या मधल्या काळातील लोकप्रिय व्हिलन म्हणून शक्ती कपूर कडे पाहिले जाते. शक्ती कपूर ह्यांनी नकारात्मक भूमिकेसोबत लोकप्रिय विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या आहेत.
शक्ती कपूर ह्यांनी शिवांगी कोल्हापुरे (पद्मिनी कोल्हापुरे ह्यांची मोठी बहीण) सोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. सिद्धांत कपूर आणि श्रद्धा कपूर.
जन्म : ३ सप्टेंबर १९५२ (वय : ६५), दिल्ली

५. डॅनी डेंझोनगपा आणि गावा डेंझोनगपा :

डॅनी डेंझोनगपा ह्यांचे नाव बॉलिवूडच्या लोकप्रिय व्हिलनच्या यादीत घेतले जाते. अग्निपथ मधील त्यांची ‘कांचा चिना’ ची भुमीका सर्वात जास्त लोकप्रिय ठरली.
त्यांचे लग्न गावा डेंझोनगपा ह्यांच्याशी झाले.
जन्म : २६ फेब्रुवारी १९४८ (वय ६९), गंगटोक

६. सदाशिव अमरापूरकर आणि सुनंदा करमाकर :

सदाशिव अमरापूरकर ह्यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटात अनेक खलनायकी भूमिका निभावल्या.
त्यांचे लग्न सुनंदा करमाकर ह्यांच्याशी झाले.
जन्म : ११ मी १९५०, अहमदनगर
मृत्यू : ३ नोव्हेंबर २०१४, मुंबई

७. गुलशन ग्रोवर कशिश ग्रोवर :

 

बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ गुलशन ग्रोवर ह्यांनी अनेक कॉमेडी नकारात्मक भूमिका बजावल्या. बॉलिवूड तसेच हॉलीवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
१९९८ मध्ये त्यांचे लग्न फिलोमिना ग्रोवर आणि नंतर २००१ मध्ये त्यांचे लग्न काशीश ग्रोवर ह्यांच्याशी झाले. नंतर काही काळानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
जन्म : २१ सप्टेंबर १९५५ (वय ६२), नवी दिल्ली

८. कबीर बेदी आणि परवीन दुसांज :

कबीर बेदी ह्यांचे २०१६ मध्ये परवीन दुसांज ह्यांच्यासोबत झाले. त्याअगोदर त्यांचे सुजाण, निकी बेदी आणि प्रतिमा ह्यांच्यासोबत झाले आहे.
जन्म : १६ जानेवारी १९४६ (वय ७१)

९. प्रकाश राज आणि पोनी वर्मा :

सध्याच्या काळातील लोकप्रिय व्हिलन म्हणून प्रकाश राज ह्यांचे नाव हमखास घेतलं जाते. सिंघम मधील ‘जयकांत शिखरे’ असो कि वॉन्टेड मधील ‘गणी भाई’. आपल्या सशक्त अभिनयामुळे प्रकाश राज ह्यांच्या भूमिका सहज लक्षात राहतात.
२०१० मध्ये त्यांचे लग्न पोनी वर्मा ह्यांच्या सोबत झाले होते.
जन्म : २६ मार्च १९६५ (वय ५२), बेंगळूर

१०. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे :

आशुतोष राणा ह्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात नकारात्मक भूमिका केल्या आहेत. त्यांचे लग्न अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांच्यासोबत झाले. रेणुका शहाणे ह्यांनी सुद्धा मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
जन्म : १० नोव्हेंबर १९६७ (वय ४९)

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!