मुळ्याची पाने खाल्ल्याने हे आजार बरे होतात वाचून शेअर करा !

मुळा तस बऱ्याच लोकांचा नावडता पदार्थ , पण याच मुळ्याचे उपयोग इतके आहेत कि तुम्ही मुळ्याकडे मुळीच दुर्लक्ष करू शकत नाही .

मुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि मुळा भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ‘सी’, आणि फॉस्फरस सारखे महत्वपूर्ण खनिजं आढळतात, जे आपल्या शरीरातील कार्यांसाठी आवश्यक आहेत.

तर चला जाणून घेऊया मुळ्याच्या पानांच्या फायद्यांविषयी :

१. रोगप्रतिकारक क्षमता वाढवते :

मुळाच्या पानात असलेले लोह, शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करतात. मुळाच्या पानात लोह, फॉस्फरस सारखे शरीराचे रोगांपासून रक्षण करणारी खनिजे असतात. ह्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘ए’, थायामीन सारखे इतर आवश्यक खनिज असतात, जे थकवा दूर करण्यास मदत करतात. एनिमिया आणि हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण असलेल्या पेशंटला मुळाच्या पानांच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. कारण पानांमध्ये असलेलं लोह त्यांचे आरोग्य चांगले करू शकतो.

२. फायबरचा स्रोत :

मुळाच्या पानांत मुळाच्या तुलनेत जास्त फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते. मुळाच्या पानांच्या मदतीने बद्धकोष्टता आणि फुगलेले पोट (ऍसिडिटी) सारख्या अवेळी येणाऱ्या समस्यांवर अराम मिळेल.

३. मूत्रवर्धक :

मुळाच्या पानांचा रस हे नैसर्गिक मूत्रवर्धक आहे. हे स्टोन (मुतखडा) ला विरघळण्यास मदत करते तसेच मूत्राशय साफ करण्यास मदत करते. ह्याचे हे गुण मुळा मध्ये सुद्धा असतात. मुळाच्या पानांत मजबूत रेचक गुणधर्म असतात, जे बद्धकोष्ठता आणि स्टोन (मुतखडा) कमी करण्यास मदत करतात.

४. रक्त शुद्धीकरण :

मुळाच्या पानांत रक्तशोधक गुणधर्म असतात. जे स्कर्व्ही ला रोखण्यास मदत करतात. हि आश्चर्याची गोष्ट आहे कि मुळाच्या पानांमध्ये मुळाच्या तुलने अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असतात आणि म्हणून मुळाच्या पानांमध्ये मुळा पेक्षा जास्त अँटी कॉर्ब्यूटिक गुणधर्म असतात.

५. मुळव्याधावर उपाय :

मुळाच्या पानांना मूळव्याध सारख्या पीडादायक त्रासावर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. जिवाणूविरोधी गुणधर्मामुळे मुळाची पाने सूज कमी करण्याचे काम करतात. मुळाच्या पानांना सुकवून त्याची पावडर तयार करा, ह्यानंतर बरोबर प्रमाणात साखर घ्या. साखर आणि पावडर पाण्यात मिसळून जाड पेस्ट बनवा. ह्या पेस्ट ला खाऊ शकता. अथवा सूज झालेल्या ठिकाणी लावू शकता.

६. कावीळ वर उपाय :

मुळाच्या पानांपासून कावीळसारख्या आजाराचे उपचार होते. ह्या आजारात शरीर हायपरबिलारूबिनमिया (त्वचेचे पिवळे पडणे) ने पीडित होतो. मुळाच्या पानांना ह्या स्तिथीत ठीक करण्यासाठी विशेष मानले जाते. पानांना कुटून, छिद्रअसलेल्या कपड्यातुन अर्क काढून घ्या. कावीळचा इलाज करण्यासाठी हे दहा दिवस नियमित अर्धा लिटर सेवन करा. बहुतेक हर्बल औषधांच्या स्टॉकमध्ये मुळाच्या पानांचा रस असतो.

७. सांधेदुखीच्या रोगांवर इलाज :

सांधेदुखी रोग हे जगातील सर्वात दुःखदायक आजारांपैकी एक आहे. ह्यात गुढघ्यावर दुखणे आणि भयानक सूज येते जे खूप प्रकारच्या असुविधा निर्माण करतात. मुळाच्या पानांना सारख्या प्रमाणात साखर घेऊन आणि त्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे गुडघ्यावर लावू शकता. ह्या पेस्ट चा नियमित वापराने त्रास आणि सूज कमी करण्यास खूप मदत मिळेल.८. मधुमेहावर उपाय :

मुळाच्या पानांत बरेच गुणधर्म असतात जे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ह्याप्रकारे मुळाची पाने मधुमेहातील व्यक्तीला खाण्यासाठी देणाऱ्या पदार्थांमधील एक आहे. मुळ्याची पाने उच्च रक्त ग्लुकोज च्या पातळीला कमी करून मधुमेह होण्यापासून रोखतात.

९. शरीरातील विषयुक्त पदार्थ काढून टाकतो :

मुळ्याच्या पानांत आवश्यक पोषण तत्व समाविष्ट असतात. ह्यात समाविष्ट असलेले पोषक तत्व आणि रोगविरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म शरीरातील विषयुक्त पदार्थ शरीरा बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

१०. कॅन्सर सारख्या आजारावर फायदेशीर :

पानांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असतात जे एक अँटीऑक्सीडेन्ट च्या रूपात कार्य करतात. आणि शरीरातील डीएनए पेशींना मुक्त कणांच्या हानिकारक प्रभावांना नियंत्रित करतात. ह्या रोपात उपस्थति फायटोकेमिकल्स आणि अँथोसायनिन कँसर संबंधी गुणांच्या विरोधी असतात आणि शरीराला पोट, मूत्रपिंड आणि आतड्यांच्या कँसरपासून वाचवतो.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!
%d bloggers like this: