The Blog Time Health Tips साप चावल्या वर काय कराल आणि काय नाही कराल

साप चावल्या वर काय कराल आणि काय नाही करालआपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात. पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे. प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत.

फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल. कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात.

 

साप चावल्या वर काय कराल आणि काय नाही कराल

– एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्रामीण भागात होतात.

– यात बहुतेकजण शेतीवर काम करणारे सापडतात आणि 10 वर्षे ते 50 वर्षे वयाच्या व्यक्तींना, विशेषतः पुरुषांना बहुतेक सर्पदंश होतात असे आढळून आले आहे.

– सुमारे 80 टक्के सर्पदंश मे (वैशाख) ते सप्टेंबर (आश्विन) या पाच महिन्यांच्या काळात होतात. कारण उष्णता आणि पावसाचे पाणी यांमुळे सापाला बिळाबाहेर पडावे लागते.

– विशेष म्हणजे 70 टक्के सर्पदंश पायावर (मांडीपासून खाली) होतात.

 

 

शास्त्रीय प्रथमोपचार

योग्य व तत्पर प्रथमोपचारानेच बहुतेक रुग्ण वाचू शकतात. कोणतेही तंत्रमंत्र किंवा नवस केल्याने सर्प विष उतरत नाही. असे सांगणारे नव्वद टक्के लोक हे तो साप मुळात विषारी नसल्यानेच वाचतात. मात्र केवळ भीतीनेही जीव जाऊ शकतो.

1. संबंधित व्यक्तीला आणि कुटुंबातल्या लोकांना धीर दिला पाहिजे. बहुतेक साप बिनविषारी असतात हे त्यांना सांगून धीर द्या.

– एकूण सर्पदंशापैकी निम्मे पावलावरच होतात.
2. साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही.

3. बिनविषारी साप असेल तर फक्त जखम धुऊन जंतुनाशक औषध लावले तरी पुरते. मात्र रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्यक असते.

4. संपूर्ण हात किंवा पाय लवचीक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. सर्व विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो.

5. नंतर त्या हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.

6. साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यावे. झापड येत नाही ना किंवा कुठून रक्त वाहत नाही ना याकडे लक्ष ठेवावे.

साप मारलेला असेल तर बरोबर घेऊन जावा. यामुळे निदान करायला मदत होईल. आपल्या भागातील कोणत्या दवाखान्यात सर्पदंशाचा उपचार मिळतो हे आपल्याला माहीत हवे.

लोक सरसकट सगळेच साप मारतात. असे करू नये. धान्याची नासाडी करणा-या उंदरांना साप खातो. आणि सर्वच साप काही विषारी नसतात.

सर्पदंशाच्या प्रसंगी काय करू नये?

मांत्रिकाच्या मागे लागून वेळ फुकट घालवू नका. साप चावून काही मांत्रिकही मेले आहेत.
– रक्तप्रवाह थांबेल अशी आवळपट्टी अवयवास बांधू नका. पूर्वी अवयवावर एकाच ठिकाणी वर कुठेतरी आवळपट्टी बांधत असत. यामुळे जखमेतून जास्त रक्त जाते आणि त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. दोन तासांहून जास्त वेळ अशी आवळपट्टी बांधल्यास हात काळा पडून शेवटी कायमचा गमवावाही लागू शकतो.
– जखमेतून रक्त काढू नये. तसेच जखम कापू नये किंवा चोखू नये. याचा काहीही उपयोग नसतो. उलट ते घातकच ठरू शकते.
– एक उपाय म्हणून काही लोक एकामागे एक कोंबडयांचे गुदद्वार जखमेला दाबून लावतात. याचा काहीच उपयोग नसतो. फक्त कोंबडया मरतात.
जर रुग्णालय व तज्ज्ञ वैद्यकीयसेवा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणे चांगलेच. हे करीत असताना वाहनाची जुळवाजुळव, प्रवास, इत्यादी वेळात प्रथमोपचार करावेत.

समजा रुग्णालय फार लांब असेल, वाहनाची सोय नसेल, साप विषारी असेल आणि सर्पाच्या विषलक्षणांचीही सुरुवात दिसत असेल तर अशा परिस्थितीत काय करणार? अशी अवघड परिस्थिती उभी असेल तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करणे आवश्यकच आहे. अशा दुर्गम गावांमधल्या वैद्यकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व तयारी अधिक चांगली पहिजे. सुदैवाने सर्पदंशावर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. त्यातला थोडाफार धोका पत्करून जमेल तितका प्रयत्न केला पाहिजे. म्हणून उपचाराचा भाग खाली जरा विस्ताराने दिला आहे.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!