26 वर्षांपूर्वी पळून जाऊन 50 रुपयांत केले होते लग्न! बघा महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींची रोमांचक प्रेम कहाणी !

महाराष्ट्रातील वहिनींना होम मिनिस्टरचा मान मिळवून देणारे आदेश भावोजींच्या ख-या आयुष्यातील होम मिनिस्टर आहेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. आदेश यांच्या पत्नीला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. 26 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत.

त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे. आदेश भावोजींना खरी ओळख मिळवून देणा-या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांना त्यांच्या आयुष्याची होम मिनिस्टर अर्थातच सुचित्रा बांदेकर कशा मिळाल्या….

महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवर प्रसारित होणारा होम मिनिस्टर. या कार्यक्रमाला आज यशस्वी 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर घराघरांत लोकप्रिय झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकरांनी 12 लाखांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. शहर, खेड्यात जाऊन आदेश बांदेकरांनी महाराष्ट्रातील वहिनींना पैठणीची भेट दिली.

आदेश आणि सुचित्रा बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कपल. महाराष्ट्रातील तमाम वहिनींच्या लाडक्या भावोजींची लग्नगाठ कशी बांधली गेली, याचीही एक रंजक गोष्ट आहे. आदेश आणि सुचित्रा यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले होते. सुचित्रा यांच्या घरी प्रेमप्रकरण पसंत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी आदेश यांचे इंडस्ट्रीत स्ट्रगल सुरु होते. त्यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितले नाही. या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांनी लग्न केले आणि नंतर घरी कळवले. त्यांच्या लग्नाला निव्वळ 50 रुपये खर्च आला होता.

सुचित्रा यांना बघताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते आदेश… सुचित्रा नववीत असल्यापासूच आदेशला यांना आवडत होत्या. सुचित्राला प्रपोज करण्यासाठी हे तिच्या घरी डायरेक्ट शिरले होते. ‘रथचक्र’ नावाची कमलाकर सारंग यांची एक मालिका सुचित्रा करत होत्या. एका दिवसाच्या शुटिंगसाठी आदेश तिथे गेले होते. तेव्हा शुटिंग दरम्यान तीन-चार रिटेक झाले. रिटेकच्या वेळी पायर्‍यांवर सुचित्रा बसल्या होत्या. त्यांना तिथे पाहताचक्षणी आदेश त्यांच्या प्रेमात पडले होते. आदेश त्यांचा पाठलाग करत त्यांच्या शाळेपर्यंत पोहचले. शेवटी सुचित्रा कंटाळून आदेशला म्हणाल्या, की मला माफ करा मी काही होकार देऊ शकत नाही. नंतर एकदा शाळा सुटल्यावर आदेश यांनी सुचित्रा यांना गाठले आणि परत भेटायला बोलावले. आदेश यांनी स्टेशननजीकच्या एका हॉटेल मध्ये सुचित्रा यांना भेटायला बोलावले होते. सुचित्रा त्यांच्या एका मैत्रिणीबरोबर त्यांना भेटायला निघाल्या, ख-या पण आधीच भिती वाटली म्हणून तिकडे न जाता त्या मैत्रिणी बरोबर दुसरीकडे फिरायला गेल्या. इकडे आदेश 3 तास त्यांची वाट पाहत बसले होते.

सुचित्रा यांची वाट बघून आदेश थकले आणि ते त्यांच्या घरी पोहोचले. सुचित्रा जेव्हा मैत्रिणीबरोबर घरी आल्या तर आदेश सुचित्रा यांच्या आईबरोबर गप्पा मारत बसले होता. त्यांना पाहुन सुचित्रा खूप घाबरल्या होत्या. थोड्यावेळाने सुचित्राची यांच्या आई आदेश त्यांच्या बरोबर बाहेर पडल्या. त्यांच्यासोबत आदेशसुद्धा बाहेर पडले. सुचित्रा यांच्या आई बसमध्ये चढल्या, तेव्हा मला माझ्या एका मित्राला भेटायचे आहे, म्हणून आदेश बसमध्ये चढलेच नाही. सुचित्रा यांच्या आई बसमध्ये निघून गेल्यानंतर आदेश यांनी थेट यूटर्न घेऊन पुन्हा सुचित्रा यांचे घर गाठले. घरी पोहोचल्यावर सुचित्रा यांनी दार उघडले, त्यावेळी आदेश खूप खूप चिडले होते. ते सुचित्राला म्हणाले, हो असेल तर हो म्हण किंवा नाही म्हण. मी परत तुझ्या वाट्याला नाही येणार. मी आज तुला घेऊन महालक्ष्मीला जाणार होतो. मी तुला 5 मिनिटे देतो मला आत्ता तुझं उत्तर दे. आदेश यांनी सुचित्रा यांना होकारासाठी फक्त पाच मिनिटे दिली होती. पाच मिनिटे झाली आणि आदेश उठले, तेव्हा सुचित्रा आदेशला म्हणाल्या, कधी जायच महालक्ष्मीला! अशाप्रकारे दोघांचे सूत जुळले आणि दोघांनी लग्न थाटले.

सुचित्रा आणि आदेश यांना सोहम हा एकुलता एक मुलगा आहे. आदेश यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून बी. कॉममध्ये पदवी प्राप्त केली आहे. 14 नोव्हेंबर ही आदेश आणि सुचित्रा यांच्या लग्नाची तारीख आहे. सुचित्रा यांच्या घरी प्रेमविवाहाला परवानगी नव्हती. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात भेटल्या. तिथे दोघांचे लग्न झाले. केवळ 50 रुपये त्यांच्या लग्नाला आलेला खर्च आहे.

Source : http://beinghindustani.com/

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!