हॉटेल मध्ये भांडी घासण्यापासून ते खाणीत कोळसा उचलण्यापासून ते आजपर्यत .. रतन नवल टाटांचा जीवन प्रवास .. वाचाल तर जीवनाला नवीन दिशा नक्कीच मिळेल …

आज आपण बघतो ते रतन टाटा . टाटा इंडस्ट्रीस चे मालक .. जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक … ब्रिटिशाना आपल्या हाताखाली काम करायला लावणारे रतन टाटा .. खायच्या मीठा ठ पासून ते आर्मी च्या गाड्यापर्यंत प्रत्येक business मध्ये यश मिळवणारे रतन टाटा … आपल्या कमाई चा ७०% भाग दान करणारे रतन टाटा … एवढे श्रीमंत असून देखील इकोनोमि प्रवास करणारे रतन टाटा .. किती सांगावं किती बोलावं या माणसाबद्दल बोलत राहील तर शब्द संपतील पण यांचे कर्तृत्व संपणार नाही …

आज जे आपण बघताय ते फक्त हिम नगाच शिखर आहे … कधी या हिम नगाचे मूळ किती खोल आणि घट्ट आहे याचा विचार केलाय का ?
चला तर मग जाणून घेऊ !

रतन नवल टाटा यांच्याबद्दल … काय चालतंय न्हवं ?

तर रतन यांचा जन्म झाला एका मध्यम वर्गीय फॅमिली मध्ये २८ dec १९३७ ला … त्यांनतर टाटा कुटुंबाने त्यांना एका पारशी अनाथालयातून दत्तक घेतले .. दत्तक घेतल्या नंतर काहीच दिवसाचं टाटांच्या आई वडिलांचा (नवल टाटा आणि त्यांची बायको ) घटस्फोट झाला आणि रतन टाटा आपल्या आजी सोबत राहू लागले.

रतन याना स्वतःचे टाटा हे नाव विसरुन स्वतःचे असे नवे विश्व निर्माण करायचे होते त्यामुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन कॉर्नेल विद्यापीठ आपलं आर्किटेक्ट चा शिक्षण सुरु केलं .. पण या काळात त्यांनी आपल्या घरून म्हणजे टाटा काढून कधीही पैसे घेतले नाहीत .. अमेरिकेतील १० वर्ष्यांच्या कार्यकाळात त्यांनी हॉटेल मध्ये भांडी घासून आणि कोळश्याच्या खाणीत कोळसा उचलून स्वतःचा खर्च भागवला .. खर तर टाटा सुमूहाच्या नातवाला इतके कष्ट करण्याची काहीच गरज न्हवती पण स्वतःच विश्व निर्माण करायची एक जिद्द असते ती रतन याना शांत बसू देईना त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दाखविले ..

१९६२ मध्ये आपल्या आजीची तब्बेत खराब झाली असता ते त्यांना बघन्यासाठी भारतात आले तेंव्हा त्यांची भेट टाटा चे प्रमुख आणि रतन चे आजोबा( दत्तक) जे आर डी टाटा यांच्या सोबत झाली आणि त्यांनी रतन ला आपली कंपनी जॉईन करायची ऑफर दिली .. रतन यांनी जे आर डी ची खालावत चालली प्रकृती बघता हि ऑफर मान्य केली .

१९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले.

पहिलं अपयश

 

संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली.

दुसरं अपयश

एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. .स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत.

पदमविभूषण

ते भारताच्या पदमविभूषण अवॉर्ड नी सन्मानिआहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव.

 

इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती

याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.

मोठी स्वप्न बघणारी मानस मोठी होत नसतात .. त्यासाठी अविरत प्रयत्न करणारे नक्की होतात .. ठरवा तर मग फक्त स्वप्नचं मोठी बघायची कि ती पुरी कार्यासाठी मोठा लढा

 

 

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!